Published On : Thu, Apr 6th, 2023
By Nagpur Today Nagpur News

वडिलांच्या जागेवर घटस्फोटीत मुलीला अनुकंपा नोकरी मॅटचे एसआरपीएफला आदेश

Advertisement

नागपूर : राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असताना मृत्यू पावलेल्या हवालदाराच्या विधवा मुलीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय लवादाने एसआरपीएफ व नागपुरातील ग्रुप ४ च्या कमांडट यांना दिले.

रोशनी दशरथ मुंगभाटे असे मॅटने दिलासा दिलेल्या याचिकाकर्त्यांचे नाव आहे.रोशनी यांचे वडील अंबादास राजने हे एसआरपीएफ येथे हवालदारपदी कार्यरत असताना १३ जून २००८ त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या पत्नीने अनुकंपा तत्वावर नोकरी मिळण्यासाठी अर्ज केला होता. अनुकंपा प्रतीक्षा यादीत त्यांचे नाव असताना २०१७ मध्ये पत्नीचाही मृत्यू झाल्याने मुलगा मंगेश राजने यांचे नाव प्रतीक्षा यादीत समाविष्ट करण्यात आले.

मंगेश राजने याला नोकरी प्रदान करण्यासाठी एसआरपीएफने चारित्र्य पडताळणी केली असता त्याच्यावर गुन्हे दाखल असल्यामुळे त्याला शासकीय नोकरी दिली जाऊ शकत नाही, असे एसआरपीएफने कळवले. दरम्यान अंबादास राजने यांची मुलगी रोशनी यांचा घटस्फोट झालेला असून त्यांनी आपल्या भाऊ मंगेश राजने याच्याऐवजी आपल्याला अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याच्या यादीत समाविष्ट करून नोकरी देण्याची विनंती एसआरपीएफला केली.

Today’s Rate
Friday 22 Nov. 2024
Gold 24 KT 77,700 /-
Gold 22 KT 72,300 /-
Silver / Kg 90,900/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पण, एसआरपीएफने त्यांची विनंती नाकारली. त्याविरूद्ध त्यांनी ॲड. नाझीया पठाण व ॲड. मंगेश राऊत यांच्यामार्फत मॅटमध्ये याचिका दाखल केली. या याचिकेवर मॅटचे सदस्य न्या. मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर मॅटने याचिका मंजूर करीत रोशनी यांचे नाव अनुकंपा यादीत समाविष्ट करून त्यांना योग्य ती नोकरी प्रदान करण्याचे आदेश सीआरपीएफला दिले.

Advertisement