नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी गैरप्रकार केल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधींनी आज पत्रकार परिषद घेत केला. त्यांच्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने अगोदरच यावर आपले स्पष्टीकरण दिले आहे. राहुल गांधी दिल्लीच्या निकालापूर्वी ते स्क्रिप्ट तयार करत आहेत.कारण त्यांना पराभवाची भीती वाटत असून सध्या ते अस्वस्थ असल्याचे फडणवीस म्हणाले.
दरम्यान निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत राहुल गांधी म्हणाले की, “महाराष्ट्रात पाच वर्षांत जितक्या नव्या मतदारांची नोंद झाली नाही, त्यापेक्षा अधिक मतदार शेवटच्या पाच महिन्यांत नोंदवले गेले.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान ३९ लाख नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली. म्हणजे हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येपेक्षाही अधिक मतदार या कालावधीत नोंदवण्यात आले. हे मतदार नेमके आले कुठून?असा सवाल राहुल यांनी उपस्थित केला आहे.