आम आदमी पार्टी तर्फे गांधीबाग सहआयुक्त यांना निवेदन
नागपुर– मध्य नागपूर मधील प्रभाग १८, सिसरपेठ मधील डॉ. वानस्कर यांच्या घरा समोरील लिकेज गटारी मुळे विहिरीला गटारीचे दूषित पाणी झिरपून परिसरात मोठ्या प्रमाणात रोगाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच प्रमाणे नित्यानंद बाबा मंदिर समोर तलमले यांच्या घरी सुद्धा याच प्रकारे गटारीचे पाणी पिण्याच्या पाण्याच्या टाक्याला झिरपत आहे.
या गंभीर समस्या मुळे परिसरात रोगराईचे वातावरण निर्माण झाले आहे व नागरिकांन मध्ये अत्यंत रोष आहे, ही जनसमस्या सोडविण्यासाठी आम आदमी पार्टी मध्य नागपूर तर्फे मनपा सहआयुक्त गांधीबाग झोन ला निवेदन देण्यात आले व तातडीने या समस्येची पाहणी करून संपूर्ण समस्या सोडूऊन देण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा आम आदमी पार्टी नागपूर तर्फे महानगर पालिका विरूद्ध तीव्र आंदोलन कण्याचा ईशारा देण्यात आला.
यावेळी आम आदमी पार्टीचे विदर्भ युवा आघाडी संयोजक पियुष आकरे, नागपूर शहर युवा आघाडी अध्यक्ष गिरीष तितरमारे, मध्य नागपूर अध्यक्ष नीलेश गहलोत, सहित समस्त आप मध्य नागपूर विधानसभा कार्यकर्ता उपस्थिती होते.