नागपूर, दि. १० फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता धनवटे नॅशनल कॉलेज, नागपूरच्या कॅडेट्सनी अभिमानास्पद कामगिरी करत संपूर्ण महाराष्ट्राचे नाव उज्जवल केले त्याबद्दल महाविद्यालयात त्याचा विशेष सत्कार करण्यात आला.
नुकत्याच दिल्ली येथे संपन्न झालेल्या ऐतिहासिक प्रजासत्ताक दिन परेडमध्ये महाविद्यालयाच्या जे. यू. ओ. आर्यन उमरेडकर याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत पथकाचे नेतृत्व केले आणि आपल्या उत्कृष्ट कामगिरीने इतिहास रचला. त्याच्या या उल्लेखनीय कार्यामुळे त्याचा महाविद्यालयात शाल श्रीफळ व बुके देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
त्याचबरोबर, जे. यू. ओ. राखी ठाकूर हिने आंतर-डायरेक्टर रायफल शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये भाग घेत महाविद्यालय तसेच नागपूर ग्रुपचे प्रतिनिधित्व केले. तिच्या या कामगिरीने महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे. तसेच, कॅडेट भाविका नागपुरे, कॅडेट काजल सहारे आणि कॅडेट मेघा शाहू यांनी पुणे येथे झालेल्या आर्मी डे परेडमध्ये भाग घेऊन आपल्या कठोर प्रशिक्षणाचा प्रत्यय दिला. त्याच्या यशामुळे महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली आहे या कामगिरीने कॉलेजच्या प्रत्येक एन सी सी कॅडेट ला अभिमानाची आणि प्रेरणाची अनुभूती मिळाली. धनवटे नॅशनल कॉलेजच्या एन. सी. सी. विभागाच्या ए एन ओ कॅप्टन डों सुभाष दाढे यांनी सर्वाना मदत केली आणि त्याच्या कठोर मेहनतीने त्यांना हे ऐतिहासिक यश मिळाले.
या सर्व कॅडेट्सच्या अथक परिश्रमांचा गौरव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत कोठे यांनी केला. त्यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून त्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा मान महाविद्यालयास लाभला असून या विद्यार्थ्यांच्या यशामुळे संपूर्ण महाविद्यालयाला अभिमान वाटत आहे.
त्याच्या यशामुळे महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली आहे या कामगिरीने कॉलेजच्या प्रत्येक एन सी सी कॅडेट ला अभिमानाची आणि प्रेरणाची अनुभूती मिळाली. या प्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी एन. सी. सी. चे कॅडेट व विध्यार्थ्यानी त्याना शुभेछा दिल्या