वणी – वणी-घोन्सा शिबला राज्य शासनाचा राज्य क्र,314 राज्य मार्ग वेकोली प्रशासनाच्या बेजवाबदार नियोजनाने हा चालू रस्ता वर्दळीचा व या रस्त्यावरून मोठ्या संख्येने वाहतूक सूरू असतांनासूद्धा हा रस्ता वेकोली(WCL)प्रशासनाने खोदल्यामूळे या रस्त्यावरून वाहतूकदारांची गैरसोय होत असून हा रस्ता तात्काळ दूरूस्त करून पूर्ववत करावा या अाशयाने निवेदन जिल्हा परिषद सदस्य सौ,मंगलाताई दिनकरराव पावडे व इंदिरा सूत गिरणीचे संचालक दिनकरराव पावडे यांनी उपविभागीय अधिकारी श्री,डाँ,शरद जावळे साहेब,अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यवतमाळ,सार्वजनिक बांधकाम विभाग वणी यांना दिले होते,
त्या अनूषंगाणे प्रशासनाकडून निवेदनाची दखल घेत दि,6 अाँगस्ट रोजी वळविलेला रस्ता वणी-घोन्सा राज्य मार्गवरील रस्त्याची दूरूस्ती करीता पाहणी करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम पांढरकवडा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री,अरचूंळे,उपअभियंता श्री,ओचावार,शाखा अभियंता श्री,खडसे,WCL चे श्री गौतम बरसूटकर,श्री,इंदिरा सूत गिरणीचे संचालक दिनकरराव पावडे घटनास्थळी पाहणी करण्याकरिता दाखल झाले असून रस्ता दूरूस्त करून पूर्ववत रस्ता सूरू होणार असल्याचे चित्र दिसत अाहे.