नागपूर : राज्य सरकारने विदर्भात फिल्मसिटी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दिशेने कामही सुरू झाले आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 100 एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या या फिल्मसिटीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नागपुरातच फिल्मसिटी तयार होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. फिल्मसिटी प्रकल्पाबाबत राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागपुरात बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना लवकरच प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले. काल चित्रपटसृष्टीशी निगडीत लोकांचा एक ग्रुप नागपुरात आला होता.
ज्यांना जिल्हा प्रशासनामार्फत रामटेक, कमलेश्वर, सावनेर येथील जागा दाखविण्यात आल्या आहेत. जवळपास 100 एकर परिसरात होणार फिल्मसिटीची निर्मिती होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.