नागपूर : नागपूर महानगरपालिका व अंर्तमना क्रीऐशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षा निमित्त जागर स्वातंत्र्याचा देशभक्ती गीत गायन स्पर्धेची प्राथमिक फेरी रविवारी कविवर्य सुरेश भटट सभागृहात पार पडली. या स्पर्धेत एकूण १६५ गायक कलावंतानी सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये गांधीबाग झोनच्या सभापती श्रीमती श्रध्दा पाठक, समाजसेवक संजय चिंचोळे, अंर्तमना क्रिएशन्सचे कुणाल गडेकर, मकरंद भालेराव उपस्थित होते.
या स्पर्धेला परिक्षक म्हणून श्री. अविनाश घोंगे व मुकुल पांडे हे होते. ही स्पर्धा वैयक्तीक व सांघीक या गटात घेण्यात आली. या स्पर्धेची महाअंतीम फेरी २ मार्च, २०२२ रोजी सायंकाळी ६.०० वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा.महापौर श्री.दयाशंकर तिवारी तर विशेष अतिथी म्हणून सुप्रसिध्द गीतकार जयंत इंदुरकर हे उपस्थित राहतील. कार्यक्रमाला विशेष उपस्थित म्हणून आमदार सर्वश्री. प्रवीण दटके, विकास कुंभारे, मोहन मते, उपमहापौर मनीषा धावडे, सभापती स्थायी समिती श्री. प्रकाश भोयर, मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी.,सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, गांधीबाग झोनच्या सभापती श्रीमती श्रध्दा पाठक, क्रीडा सांस्कृतिक सभापती प्रमोद तभाने, अति.उपायुक्त श्री. दीपककुमार मीना, क्रीडा अधिकारी पियुष आंबुलकर आदी प्रामुख्याने उपस्थित राहतील. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल.
या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून कुणाल गडेकर व मकरंद भालेराव आहेत.