– सुरक्षेच्या कारणास्तव दोन वर्षांपासून होते बंद
नागपूर: सुरक्षेच्या कारणावरून मागील दोन वर्षांपासून बंद असलेले रेल्वे स्थानकाचे प्रवेश व्दार अखेर उघडण्यात आले. अर्थात गाडी आल्यावरच ते प्रवेशव्दार उघडले जाते, नंतर बंद करतात. त्या ठिकाणी आरपीएफ जवान तैनात असून प्रवाशांची थर्मल स्क्रिqनग केली जाते. आता रेल्वे स्थानकावर मुख्य प्रवेशव्दारासह लोहमार्ग ठाण्याजवळील म्हणजे रेल्वे तिकीट केंद्रा शेजारीच असलेला प्रवेशव्दार उघडण्यात आला आहे.
मागील काळात सुरक्षावरून मोठा प्रश्न निर्माण झाला होता. देशात दहशतवादी शिरण्याची शक्यता असून कुठेही घातपाताच्या कारवाई करू शकतात. अशा स्थिती होती. त्यामुळे तत्कालिन वरिष्ठ सुरक्षा आयुक्त ज्योतिकुमार सतीजा यांनी रेल्वे स्थानकावरील सर्व दारे बंद केली होती. केवळ मुख्य प्रवेशव्दारच सुरू होते. लहान मोठे आणि अवैध मार्गही बंद केले होते. त्यामुळे प्रवाशांसह कर्मचाèयांना ये-जा करण्यासाठी मुख्य प्रवेशव्दारच होता.
आता कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर भौतिक दुरत्व राखायचे आहे. मास्क आणि निर्जुंतुकीकरण करणेही आवश्यक आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाकडू सतत जनजागृती केली जात आहे. यापाश्र्वभूमीवर मध्य रेल्वेचे सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडेय यांनी लोहमार्ग ठाण्याजवळील बंद प्रवेशव्दार सुरू करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी त्याची ट्रायलही घेण्यात आली. बुधवारपासून दार उघडण्यात आली.
प्रवेशव्दार उघडले असले तरी कायमस्वरुपी नाही. गाडी आली तेव्हाच ते उघडले जाते नंतर बंद करतात. या प्रवेशव्दारावर आरपीएफ जवान तैनात असतात आणि प्रवाशांची थर्मल स्क्रिqनगही केली जाते.