Published On : Fri, Jun 26th, 2020

अखेर त्या दुसऱ्या शिवभोजन थाळी केंद्राचा थाटात शुभारंभ

Advertisement

– शिवभोजन थाळीतून मिळते फक्त पाच रुपयात पोटभर जेवण


कामठी – तालुका प्रशासनाच्या वतीने मान्यताप्राप्त असलेल्या जिजाबाई महिला बचत गट नामक संस्थेला मान्यताप्राप्त शिवभोजन थाळी केंद्राचा काल सायंकाळी 6 वाजता बस स्टँड चौकात राज्याचे पशु व संवर्धन , क्रीडा व युवक मंत्री तसेच भंडारा व वर्ध्याचे पालकमंत्री ना सुनीलबाबू केदार यांच्या शुभ हस्ते लाल फिती कापून करण्यात आला.याप्रसंगी नागपूर जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर, माजी नगराध्यक्ष शकुर नागाणी, माजी उपाध्यक्ष काशीनाथ प्रधान, अनुराग भोयर, आबीद ताजी, इर्शाद शेख,कृष्णा यादव, नितेश यादव, रंजित सहारे,नारायण शर्मा, कांग्रेस सेवादल चे कामठी शहराध्यक्ष मो सुलतान, फारूक कुरेशी, राजकुमार गेडाम,संदीप जैन, सलामत अली, सिराज भाटी, नितु दुबे, तसेच जिजाबाई महिला बचत गट चे समस्त पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.

महाविकास आघाडीतील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्वकांक्षी योजनेतुन सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी योजना यशस्वी ठरली असून या कोरोना विषाणूच्या लढाईत सुरू करण्यात आलेले शिवभोजन थाळी हे अनेक बेघर , निराश्रित तसेच गरजू व गरिब नागरिकांची भूक शंमविण्याचे काम ही फक्त 5 रुपयात मिळणारी शिवभोजन थाळी करीत आहे.

Today’s Rate
Wenesday 31 Oct. 2024
Gold 24 KT 80,000 /-
Gold 22 KT 74,400 /-
Silver / Kg 97500 /-
Platinum 44000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कोरोना आपत्ती काळात 10 रुपयाला मिळणारी शिभोजन थाळी ही 5 रुपयाला मिळत असून या शिवभोजन थाळीचा गरीब व गरजू नागरिकांना आस्वाद घेता येनार आहे .या शिवभोजन थाळीचा मुख्य उद्देश प्रत्येक गरजू , बेघर आणि निराश्रित नागरिकांना चांगले आणि पोटभर जेवण मिळने शिवभोजन थाळी केंद्र तुन दररोज 90 पेक्षा अधिक गरजू नागरिकांना फक्त पाच रुपयात शिवभोजन थाळीतुन भूक शमविनार आहे त तर भूक शमविण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची फोटो व नाव तसेच मोबाईल क्रमांक घेऊन स्वतंत्र शिवभोजन ऐप वर त्वरित पाठविण्यात येईल त्यानंतरच ही शिवभोजन थाळी देण्यात येनार आहे.या शिवभोजन थाळीतून भात, पोळी, तसेच दाळ व भाजी देण्यात येणार आहे तसेच या शिवथाळी भोजन मधून पोटभर मिळनार असलेल्या जेवणातून गरजू नागरिकांच्या पोटाचा एक आधार बनणार आहे.

Advertisement

बॉक्स:-कामठी तालुक्यात मर्यादित असलेल्या दोन शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यासाठी तहसील प्रशासनाकडे आलेल्या अर्जातून दोन संस्थांना शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्याची मान्यता देण्यात आली होती यानुसार कामठी मोटर स्टँड चौकातील ढोलनदास रेस्टॉरेंट नामक संस्थेने शिवभोजन थाळी केंद्र सुरु केले होते मात्र दुसरी मान्यताप्राप्त जिजाबाई महिला बचत गट संस्थेने ही शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यासाठी मुहूर्ताच्या प्रतीक्षेत होते मात्र यांसंदर्भात दैनिक देशोन्नतीने बातमी प्रकाशित होताच अवघ्या तीन दिवसात या दुसऱ्या शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात आले.