कन्हान : – पचायत समिती पारशिवनी अंतर्गत साटक केंद्राच्या शालेय दोन दिवसीय क्रिडा स्पर्धा जि प उच्च प्राथमिक शाळा केरडी येथे थाटात संपन्न झाल्या .
नुकत्याच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा केरडी येथे साटक केंद्र अंतर्गत दोन दिवसीय शालेय क्रिडा स्पर्धाच्या समारोप मा चंद्रभानजी वानखेडे अध्यक्ष शा.व्य. समिती यांच्या अध्यक्षेत प्रमुख अतिथी मा प्रकाश पडोळे सरपंच केरडी, मा लक्ष्मण खंडाळ उपसरपंच,प्रकाश खंडाळ केंद्र प्रमुख बेले सर आदी मान्यवरांच्या उपस्थित विजयी संघाना बक्षीस वितरण करून करण्यात आला . मा दयारामजी भोयर उपाध्यक्ष कुस्तीगीर संघ नागपुर यांच्या हस्ते क्रिडा ध्वजारोहण करून दोन दिवसीय क्रिडा स्पर्धाचे उदघाटन करण्यात आले होते . यात साटक केंद्रातील १२ शाळेच्या चंमुनी सहभाग घेतला होता .
पहिल्या दिवशी सांघिक खेळ तर दुसऱ्या दिवसी १०० मी रिले रेस, उंच उडी , लांब उडी , संगीत खुर्ची , व वैयक्तिक खेळ घेण्यात आले . वरिष्ठ गट कबड्डी मध्ये केरडी च्या संघाने तर कनिष्ठ गट कबड्डीत बोरडा शाळेच्या संघाने विजय मिळविला . जि प शाळा केरडी च्या खेडाळुनी विविध खेळात विजश्री पटकावित केंद्र चँम्पीयन शिल्ड प्राप्त केली. विजयी संघ व खेडाळुना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले . कार्यक्रमाचे केंद्र प्रमुख बेले सर यांनी प्रास्तविकातुन खेळाचे महत्त्व सांगितले .
सुत्रसंचालन शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा माथुरकर हयानी तर आभार श्री चौधरी सर यांनी व्यकत केले . दोन दिवसीय केंद्र क्रिडा स्पर्धाच्या यशस्वीते करिता श्री पनवेलकर सर, चौधरी मँडम साटक केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी खेडाळु व गावक-यांनी सहकार्य करीत क्रिडा स्पर्धा थाटात संपन्न केल्या .