Advertisement
नागपूर : शहारत दिवसेंदिवस आगीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. पूर्व वर्धमान नगर येथील स्वामी नारायण शाळेजवळ निवासी परिसरातील परफेक्ट सायकल अँड रेगझिंन स्टोअर्स आणि फोमच्या गोदामाला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.
ही आग गुरुवारी रात्री सव्वा दोनच्या सुमारास लागली आग असून अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले असून यासाठी अग्निशमन दलाच्या ६ गाड्या बोलविण्यात आल्या होत्या.
दरम्यान या आगीत शंभर पेक्षा सायकली जाळून खाक झाल्या आहेत. गोदामाच्या आजूबाजूला असलेल्या इमारती आणि घरांचेही यात मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.