नागपूर: शहरातील लकडगंज परिसरात असलेल्या आरा मिलला आज भीषण आग लागली. लकडगंज येथील आरा मशीन/टिंबर मार्केटमध्ये ही घटना घडली असून अग्निशमन दलाच्या प्रयत्नामुळे आग आटोक्यात आली आहे. मात्र आज इतकी झपाट्याने पसरली होती की आजूबाजूच्या सहा मिल या आगीच्या कचाट्यात आल्या.
आगीचा प्रभाव वाढल्यानंतर दूर दूर पर्यंत धुराचे लोट हवेत पसरले होते. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
आरा मिलमधील आजूबाजूच्या परिसरात लाकडांचा साठा असलेले गोदाम आहेत. त्यामुळे गंभीरता लक्षात घेत आग इतरत्र पसरू नये म्हणून आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.