Advertisement
नागपूर : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एम्प्रेस मॉलमध्ये शनिवारी भीषण आग लागली.
मॉलच्या पहिल्या मजल्यावरील एका दुकानात ही आग लागल्याने सर्वत्र खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून नेमकी आग कशामुळे लागली याबाबत कोणतीच माहिती समोर आली नाही.
सविस्तर बातमी लवकरच…