Published On : Mon, Dec 25th, 2017

Video: वाळकेश्वरमध्ये 31 मजली इमारतीच्या 17 आणि 18 व्या मजल्याला आग

Advertisement

Fire
मुंबई: वाळकेश्वरमध्ये 31 मजली इमारतीमध्ये आग लागली आहे. इमारतीच्या 17 आणि 18 व्या मजल्याला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून बचावकार्य सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार वाळकेश्वर परिसरातील लिजेंड बिल्डिंगमध्ये ही आग लागली आहे. दुपारी जवळपास चार वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. 17व्या आणि 18 व्या माळ्यावर असणा-या ड्युप्लेक्स फ्लॅटमध्ये ही आगली.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या, तीन वॉटर टँकर आणि एक रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आहे. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असून लोकांना सुरक्षितपणे इमारतीबाहेर काढण्याचं काम सुरु आहे.

Advertisement