नागपूर : दिवाळीच्या अगोदरचा रविवार असल्याने नागपुरातील मध्यवर्ती बाजार असलेल्या सिताबर्डीत खरेदीसाठी नागरिकांची सकाळपासूनच मोठी गर्दी उसळली होती. याच दरम्यान परिसरातील मुख्य मार्गावर असलेल्या दुकानाला भीषण आग लागल्याने खळबळ उडाली.
खरदेसाठी आलेल्या नागरिकांची यामुळे मोठ्या प्रमाणावर पळापळ झाली. सुदैवाने कुठलीही जीवीतहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून आग विझविण्यात आली आहे. व्यंकटेश मॉल जवळील संगम पतंग स्टोअर्स, अजय गारमेंट्स,पद्म ज्वेलरी , सौंदर्यप्रसाधन दुकानांना आगीने आपल्या विळख्यात घेतले. आज इतकी भीषण होती की सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व दुकाने एकाच इमारतीत स्थित असून एकाच व्यक्तीच्या मालकीची आहेत. अगोदर संगम पतंग स्टोअरला आग लागली नंतर आगीने कपड्याच्या दुकानाला आणि सौंदर्यप्रसाधनाच्या दुकानाला घेतले.
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कॉटन मार्केटमधील अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीमागील नेमके कारण व साहित्याचे नुकसान तत्काळ समजू शकले नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Watch the Video Here: