Published On : Sat, Apr 14th, 2018

अग्निशमन सेवेतील कर्मचाऱ्यांचे कार्य अभिमानास्पद : महापौर नंदा जिचकार

Advertisement

Fire Service Day Celebration
नागपूर: जीवाची पर्वा न करता आगीच्या घटनांमध्ये जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या अग्निशमन व आणीबाणी सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या शौर्याला आम्ही वंदन करतो, अशा शब्दात महापौर नंदा जिचकार यांनी अग्निशमन सेवेत कर्तव्यावर असताना ​नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागाच्या वतीने आयोजित अग्निशमन सेवा सप्ताहाच्या उद्‌घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. मंचावर स्थायी समितीचे सभापती विरेंद्र कुकरेजा, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, अग्निशमन व विद्युत विशेष समितीचे सभापती लहुकुमार बेहते, नगरसेवक किशोर जिचकार, निशांत गांधी, अपर आयुक्त रवींद्र कुंभारे, उपायुक्त रवींद्र देवतळे, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके उपस्थित होते.

१४ एप्रिल १९४४ रोजी लंडनहून कराची मार्गे मुंबईत गोदीत दाल झालेल्या एस.एस. फोर्ट स्टिकींग या जहाचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या आगीशी झुंज देताना अग्निशमन दलाच्या ६६ जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले. या दिवसाचे स्मरण म्हणून अग्निशमनाचे कार्य करताना प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व हौतात्म्यांना या दिवशी संपूर्ण भारतात श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. नागपूर मनपाच्या अग्निशमन विभागातील गुलाबराव कावळे, प्रभू कुहीकर आणि रमेश ठाकरे हे निरनिराळ्या घटनांत कर्तव्यावर असताना शहीद झाले. या तीनही शहीदांच्या प्रतिमेसमोर पुष्पचक्र अर्पण करून महापौर नंदा जिचकार, आयुक्त अश्विन मुदगल, स्थायी समितीचे सभापती विरेंद्र कुकरेजा आणि विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

Fire Service Day Celebration
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, शहरात कुठेही आग लागली असेल किंवा आणीबाणीची परिस्थिती असेल तेव्हा अग्निशमन विभागाचे अधिकारी, कर्मचारी जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावतात. आग लागूच नये, यासाठी आता मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

Wenesday Rate
Wednesday01 Jan. 2025
Gold 24 KT 76,900 /-
Gold 22 KT 71,500 /-
Silver / Kg 86,700 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्रास्ताविकातून मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी अग्निशमन सेवा सप्ताह आयोजनामागील भूमिका विषद केली. कार्यक्रमापूर्वी अग्निशमन विभागाच्या जवानांतर्फे महापौर नंदा जिचकार व आयुक्त अश्विन मुदगल यांनी मानवंदना स्वीकारली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. हंबीरराव मोहिते यांनी केले. आभार उपमुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे यांनी मानले.

Nanda Jichkar, Fire Service Day Celebration

प्रात्यक्षिकांचा थरार
कार्यक्रमानंतर अग्निशमन विभागाच्या जवानांनी आग लागली असताना तत्परतेने त्यावर कसे नियंत्रण मिळविल्या जाते, याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. हा संपूर्ण थरार उपस्थित नागरिकांनी अनुभवला. कार्यक्रमाला मनपाचे अधिकारी, कर्मचारी, अग्निशमन विभागाचे जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Fire Service Day Celebration

Fire Service Day Celebration

Advertisement