नागपूर :शहरात काल दिवाळी सण उत्साहात साजरा करण्यात आला. लक्ष्मीपुजनाच्या निमित्त शहरात विविध भागात फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. मात्र यादरम्यान विविध भागात १७ ठिकाणी आगी लागल्याच्या घटना घडल्या. या आगीत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसली तरी या आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीच्या घटनांची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या पथकांनी आगीवर नियंत्रण मिळविले त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
यंदा फटाके फोडणाऱ्यांवर बंदी नव्हती मात्र वेळेची मर्यादा होती. रात्री ८ ते १० दरम्यानच फटके फोडायचे होते. फटाक्यामुळे शहरात विविध ठिकाणी आगीच्या १७ घटना घडल्या असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. यामध्ये शहरातील त्रिमूर्ती नगरला ३, लकडगंज २ घटना आगीच्या घटना घडल्या तर गंजीपेठ, कॉटन मार्केट, सुगत नगर, वैशालीनार, महाल परिसरातही आग लागल्याच्या घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.