Published On : Mon, Jul 10th, 2017

हजयात्रेसाठी पहिल्या विमानाचे 10 ऑगस्टला उड्डाण

Advertisement


नागपूर:
हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरुंच्या सुविधांसाठी हज समितीचे सदस्य, स्वयंसेवक, पोलीस, प्रशासन, एअर इंडिया, मनपा, नासुप्र यांनी सातत्याने संपर्क ठेवून योग्य समन्वय राहील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना समन्वय समितीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी सर्व संबंधितांना दिल्यात.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली हज यात्रा 2017 च्या पूर्वतयारीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी हज समितीचे अध्यक्ष इब्राहीम शेख, सदस्य उस्नाबानू खलिते, सुलतान शेख, कार्यकारी अधिकारी इंतियाज काझी, नागपूर हज हाऊसचे मोहम्मद कलाम, नासुप्रचे आयुक्त दीपक म्हैसेकर, मनपाचे आयुक्त अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मुख्य कार्यपालन अधिकारी श्रीमती डॉ. कांदबरी बलकवडे, एअर इंडियाचे केंद्रीय व्यवस्थापक श्रीमती एलिस जो पॉल, एअर इंडियाच्या हज समन्वयक श्रीमती सुनिता ॲनी जॉन तसेच पोलीस विभाग, मिहान, सोनेगाव विमानतळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, दूरसंचार, रेल्वे, अग्निशमन विभाग, इमीग्रेशन, सीमाशुल्क, रेल्वे, दूरसंचार विभाग, आरोग्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Gold Rate
15 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,32,900 /-
Gold 22 KT ₹ 1,23,600 /-
Silver/Kg ₹ 1,92,100/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

हजसाठी पहिल्या टप्प्यात नागपूर विमानतळावरुन 10 ते 12 ऑगस्ट या दरम्यान हज यात्रींना घेवून विमाने रवाना होतील. दुसऱ्या टप्प्यात हजवरुन 23 ते 26 सप्टेंबर या कालावधीत यात्रेकरु परततील.

हज यात्रेकरुंना निरोप देण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मर्यादित असावी, त्यांनी मर्यादित वाहने घेवूनच नागपुरात यावे, त्यामुळे यात्रेकरुंच्या वाहनांच्या पार्किंगचा तसेच वाहतुकीचा प्रश्न उभा राहणार नाही, असे बैठकीत सांगण्यात आले. विमानतळ परिसरात नियमानुसार यात्रेकरुंना प्रवेश दिला जाईल. यात्रेकरुंखेरीज इतरांना दिल्या जाणाऱ्या सुरक्षा पासची संख्या मर्यादित असेल. विमान उड्डाणापूर्वीच सुरक्षा तपासणी आणि अन्य बाबींची पूर्तता करण्यासाठी लागणारा एकूण वेळ लक्षात घेता यात्रेकरुंनी त्यांच्या वेळापत्रकाचे काटेकोर नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले.

हज हाऊस येथे नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा. यात्रेकरुंच्या मदतीसाठी स्वयंसेवकांची संख्या वाढविण्यात यावी. तेथील 42 सीसीटीव्ही कॅमेरांची पाहणी करुन ते सुव्यवस्थित करण्यात यावे, विदेशी चलनाकरिता एजन्सीचा कक्ष स्थापित करावा, हज हाऊस येथे महानगरपालिका व इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने लसीकरण बूथ ठेवावा. यात्रेकरुंची पूर्ण आरोग्य तपासणी करुनच त्यांना प्रवासासाठी प्रमाणपत्र देण्यात यावे. रुग्णवाहिका आणि अग्निशमन यंत्रणा हज यात्रेच्या कालावधीमध्ये तैनात राहावी, असे निर्देशही यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement