नागपूर :महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.या अनुषंगाने भाजपकडून आज अधिकृतपणे उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.भाजपकडून पहिल्या यादीत 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तसेच काही जणांची तिकीट कापण्यात आले आहे. तर अनेक ठिकाणी बेड्या नेत्यांची वर्णी लागली आहे. नागपुरातून ‘या’ नेत्यांना मिळाली उमेदवारी –
नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जातो. नेहमीप्रमाणे दक्षिण- पश्चिम नागपुरातून देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तर दक्षिण नागपुरातून मोहन माते, पूर्व नागपुरातून कृष्णा खोपडे यांना तिकीट देण्यात आले आहे.तर उत्तर आणि मध्या नागपुरातून अद्यापही कोणाला उमेदवारी देण्यात आलेली नाही. ग्रामीण भागातीलकमठी मतदारसंघातून चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर हिंगणा मतदारसंघातून समीर मेघे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दुसरीकडे भोकरमधून खासदार अशोक चन्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कल्याणमधून आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.