नागपूर : शहरात औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरुन 17 मार्च रोजी महाल आणि हंसापुरी परिसरात दोन गटात झालेल्या संघर्षानंतर मोठा हिंसाचार घडला. यावेळी दगडफेक, वाहनांची तोडफोड, जाळपोळ असे प्रकार घडले होते.
या हिंसाचारादरम्यान अनेक नागरिकांसह पोलीस कर्मचारीही जखमी झाले होते. या हिंसाचारादरम्यान इरफान अन्सारी नावाचा व्यक्ती जखमी झाला होता. त्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
नागपूरच्या मेयो रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. राडा झालेल्या भागात ते जखमी अवस्थेत आढळून आला होता. हिंसाचार प्रकरणात आरोपींची संख्या 100 च्या घरात पोहोचली आहे.
आरोपींमध्ये 12 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. हमीद इंजिनिअरवर हिंसाचाराचा कट रचल्याचा आरोप आहे. हमीद इंजिनिअर मायनॉरीटी डेमोक्रॅटीक पक्षाचा कार्याध्यक्ष आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.यानंतर पत्रकार परिषद घेत फडणवीस यांनी हिंसाचारासंदर्भात सविस्तर माहिती दिली.