कामठी:-, भाजीमंडी परिसरातील अवैध कत्तलखान्यात ऑटो मध्ये जनावरे भरून जात असलेल्या ऑटो जुनी कामठी पोलिसांनी राम मंदिर रोड वर पकडून पाच जनावरांना जीवदान देऊन एकास अटक करून 1 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई गुरुवारला रात्री साडेसात वाजता सुमारास केली
जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या नुसार आरोपी इंतयाक अहमद मकसूद अहमद वय 29 राहणार इस्माईल पुरा कामठी याने सहा सीटर ऑटो क्रमांक एम एच 49 AR 8132 मध्ये बाहेरगावावरून पाच जनावरे निर्दयतेने कोंबून गुरुवार ला सायंकाळी साडेसात वाजता सुमारास राम मंदिर मार्गे भाजी मंडई कडे जात असताना डीबी पोलीस पथकाने थांबवून आरोपी इंतेयाक अहमद जनावरास संदर्भात विचारले असता त्यांनी कत्तलखान्यात जनावरे नेत असल्याचे सांगताच पोलिसांनी जनावरे भरलेला ऑटो जुनी कामठी पोलीस स्टेशनला येऊन जुनी कामठी पोलीस स्टेशनला कलम 11 (1)( ड) प्राण्यांना निर्दयतेने वागणूक देणे कायदा 1960 कलम 83 /173 नुसार गुन्हा दाखल करून आरोपी ईतेयाकअहमद यास अटक करून पाच जनावराची किंमत 75 हजार व ऑटो ची किंमत एक लाख एकूण एक लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला वरील कारवाईत जुनी कामठीचे ठाणेदार राहुल सीरे यांचे मार्गदर्शनात डीबी पथकातील हेडकॉन्स्टेबल राजेश पाली, संजय गीते ,प्रशांत सलाम, पवन गजभिये ,विजय सिंह, महेंद्र धुर्वे यांच्या पथकाने केली
संदीप कांबळे कामठी