Published On : Fri, Jan 13th, 2023
By Nagpur Today Nagpur News

हनुमान नगर झोन मधील ५ जलकुंभाची स्वच्छता जानेवारी १६ ते २३ दरम्यान

ओंकार नगर (जुने) जलकुंभ १६ जानेवारी, ओंकार नगर (नवीन) जलकुंभ : १७ , नालंदा नगर जलकुंभ: १९, श्री नगर जलकुंभ: २० आणि म्हाळगी नगर : २३.
Advertisement


नागपूर
: नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी आपल्या स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या वचनबद्धतेला अनुसरत दरवर्षीप्रमाणे आपली विशेष वार्षिक जलकुंभ स्वच्छता मोहीम-२०२२-२३ सुरु केलीली आहे. २०२३ च्या दोन आठवड्यात जवळपास १० जलकुंभ स्वच्छ करण्यात आले. आता पुढील आठवड्यात या अंतर्गत हनुमान नगर झोन मधील ५ जलकुंभ अनुक्रमे – ओंकार नगर (जुने) जलकुंभ (सोमवार) १६ जानेवारी, ओंकार नगर (नवीन) जलकुंभ- १७ जानेवारी (मंगळवारी), नालंदा नगर जलकुंभ (गुरुवारी )- १९ जानेवारी , श्री नगर जलकुंभ (शुक्रवारी) -२० जानेवारी आणि म्हाळगी नगर जलकुंभ ( सोमवारी )- २३ जानेवारी रोजी स्वच्छ करण्यात येणार आहे.

मनपा-OCW दरवर्षीच नागपुरातील सर्व जलकुंभ वर्षातून एकदा स्वच्छता करीत असते. हि परंपरा  मनपा-OCW ने गेल्या २०१२ पासून दरवर्षी नित्यनियमाने सुरु केलेली आहे. सर्व जलकुंभ सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान, फक्त ८ तासात मनपा- मनपा-OCW च्या अत्याधुनिक प्रणाली द्वारे स्वच्छ करण्यात येतात.

या जलकुंभ स्वच्छतेमुळे तेथील भागात दिलेल्या तारखेनुसार पाणीपुरवठा बाधित राहील., तरीही नागरिकांनी आपल्या परिवाराच्या वापराकरिता पुरेसा पाणी साठा करून ठेवावा हि विनंती

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 78,700 /-
Gold 22 KT 73,200 /-
Silver / Kg 91,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

हनुमान नगर झोन मधील पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग आणि दिनांक :

(सोमवार ) १६ जानेवारी –ओंकार नगर (जुने) जलकुंभ : संअभय नगर, कशी नगर, शताब्दी नगर, जुगल -ले–आऊट, चाफले ले आउट, राजश्री नगर, रेणुका विहार कॉलोनी, महात्मा फुले वसाहत, हरी ओम नगर, गजानन नगर, ८५ प्लॉट , रतन नगर, साकेत नगर, एकता सोसायटी, जोगी नगर, रहाटे टोली , रामटेके नगर,

(मंगळवार ) १७ जानेवारी- ओंकार नगर (नवीन ) जलकुंभ : राघवेंद्र सोसायटी, चंद्रिका नगर, चिंतामणी नगर , शाहू नगर, अलंकार नगर, आकाश नगर, ग्रीन प्लॅनेट सोसायटी…

(गुरुवार) १९ जानेवारी –नालंदा नगर जलकुंभ, : जय भीम नगर, पार्वती नगर, ज्ञानेश्वर नगर, कैलास नगर, बालाजी नगर, चंद्र नगर, नाईक नगर, मित्र नगर, गजानन नगर, रामेश्वरी, बॅनर्जी लेआऊट, नालंदा नगर, बँक कॉलोनी, भगवान नगर 

(शुक्रवार) ,२० जानेवारी – श्री नगर जलकुंभ  : श्री नगरसुंदरबनसुयोग नगरसाकेत नगरअरविंद सोसायटीबोरकुटे लेआऊट, PMG सोसायटीविजयानंद सोसायटी, संताजी सोसायटीडोबी नगरम्हाडा कॉलोनी, वेणुवान सोसायटी, मिलन सोसायटी, स्वामी स्वरूपानंद सोसायटी, दिन प्रजाहित सोसायटी, साई कृपा सोसायटी, सर्वत्र नगर, नवनाथ नगर, रामकृष्ण सोसायटी…

(सोमवार), २३ जानेवारी-म्हाळगी नगर जलकुंभ : महाकाली नगर , अध्यापक नगर, अमर नगर, न्यू अमर नगर, जानकी नगर, विठ्ठल नगर, संजय गांधी नगर, शिव शक्ती नगर, सरस्वती नगर, श्री राम नगर, लव- कुश नगर, धनगवळी  नगर, सन्मार्ग नगर, भोळे बाबा नगर आणि विज्ञान नगर सन्मार्ग नगर, अन्नपूर्णा नगर, नवे नेहरू नगर स्लम, विघ्नहर्ता नगर, संतोषी नगर, सरस्वती नगर, शिवशक्ती नगर,  प्रेरणा नगर, सूर्योदय नगर, महालक्ष्मी नगर, महात्मा गांधी नगर, अष्टविनायक कॉलोनी, राधाकृष्ण नगर, शिवाजी नगर, मां भगवती नग

ह्या जलकुंभ स्वच्छता  शटडाऊन दरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने, मनपा-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. 

कुठंल्याही प्रकारच्या अधिक माहितीकरिता नागरिक मनपा- OCW च्या नि:शुल्क मदत क्रमांक १८००- २६६-९८९९ वर संपर्क करू शकतात.

Advertisement