नागपूर:नागपुरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला असून एका रात्रीत 106 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले.त्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. यातच प्रशासनाकडून बचावकार्य सुरू असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे.
शहरात ठीक-ठिकाणी स्थानिक प्रशासनासह सामाजिक संस्थांद्वारे नागरिकांना भोजनाचे पॅकेट्स, पिण्याचे पाणी तसेच आवश्यक वस्तू,औषध आदी वितरीत करण्यात येत आहेत.
शहरातील पंचशील चौक , यशवंत स्टेडियम परिसर,स्वरूप नगर, प्रियांका वाडी आणि राहुल नगर यासह अनेक ठिकाणच्या नागरिकांना पुराचा मोठा फटाका बसला आहे.