Published On : Sat, Sep 16th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील कन्हान नदीला पूर ; शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होणार?

Advertisement

नागपूर : सलग दोन दिवसांपासून शहारत सुरू असलेल्या पावसामुळे कन्हान नदी दुथडी भरून वाहू लागली. याचदरम्यान शुक्रवारी सायंकाळी नवेगाव खैरी जलाशयाचे सर्व १६ दरवाजे उघडण्यात आल्याने कन्हान नदीला पूर आला. या पुरामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राच्या विहिरीत पाणी शिरले आहे. त्यामुळे शहराच्या काही भागात पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

नदीत पाण्याच्या पातळीत दर तासाला ०.५ मीटरने वाढत आहे. नदीचे पाणी कन्हान जलशुद्धीकरण विहिरीत शिरल्याने जलशुद्धीकरणाच्या कामावर परिणाम झाला आहे. सध्या तीनपैकी एकाच पंप सुरू आहे. शनिवारी पाण्याच्या पातळीत घट होताच कच्चे पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यापार्श्वभूमीवर कन्हान फीडरच्या मुख्य भागातून पाणीपुरवठा आशी नगर झोन, सतरंजी पुरा झोन, लकरगंज झोन आणि नेहरू नगर झोन आदी भागातील वस्त्यांना पाणी पुरवठा ठप्पही होऊ शकतो.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 78,700 /-
Gold 22 KT 73,200 /-
Silver / Kg 91,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement