Published On : Mon, Jul 1st, 2024

नागपूरमधील दीक्षाभूमीतील भूमिगत पार्किंगच्या मुद्द्यावरून अनुयायी आक्रमक;बांधकामाची केली तोडफोड

Advertisement

नागपूर : शहरातील आंबेडकर अनुयायांनी नागपूरच्या दीक्षाभूमीतील भूमिगत पार्किंगच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. या भूमिगत पार्किंगमुळे स्तुपाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे,असा दावा यावेळी अनुयायांनी केल्याने वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले.

परिस्थिती चिघळत चालल्याचे लक्षात येताच पोलसांचा ताफा याठिकाणी पोहोचला आहे. या प्रकरणावरून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. वंजित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट केली.

Advertisement

दीक्षाभूमी, नागपूर येथील कुठलीही पार्किंगची मागणी नसताना ट्रस्टींनी त्याचा घाट घातला. याविरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे. ट्रस्टीनी लोकांच्या भावनेशी खेळू नये. आमचाही या पार्किंगला विरोध असून आंदोलनकारी जनतेच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी उभी आहे, असे आंबेडकर म्हणाले.

दरम्यान लोकभावना पाहून नागपुरातील दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगला स्थगिती देण्यात येत आहे. स्मारक समितीशी चर्चा करून सरकारने आराखडा तयार केला होता. मात्र आता त्याला स्थगिती देण्यात येत आहे. त्यामुळे स्मारक समितीशी चर्चा केल्यानंतर या बाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल. त्यांच्याशी चर्चा करून मगच त्याचे पुढचे काम करण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत बोलताना म्हणाले.