नागपुर:अन्न व औषध प्रशासन, नागपुरने मोठी कारवाई करून ८० लाखांचा पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त केला आहे. दिनांक १६/०७/२०२४ रोजी अन्न व औषध प्रशासन (म.रा.) च्या गुप्तवार्ता विभागास मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे, जबलपुर-नागपुर नॅशनल हायवे नं. ४४ वर कंटेनर क्र. KA 01 AM 1681 (Bharat Banz) चा पाठलाग करण्यात आला. सदर कंटेनर कुंभलकर रेस्टारंट धावा, खंडाळा पटाटे शिवार, जबलपुर-नागपुर नॅशनल हायवे नं. ४४, पो. स्टे. कन्हान, ता. पारशिवनी, जि. नागपुर येथे थांबवून तपासणी केली असता, त्यात महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचना क्र. असुमाअ/अधिसूचना-४९६/७, दि. १८/०७/२०२३ द्वारे महाराष्ट्र राज्यात विक्री, साठा, वाहतूक भूकरीता प्रतिबंधित केलेला एस. एस. वन सुगंधित तंबाखू व शिखर पान मसालाचा ५७७२ कि.ग्रॅ. व रु. ७९,८६,१७८/- किंमतीचा साठा वाहतूक करतांना आढळला.
सदरचा संपूर्ण साठा व कंटेनर अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००९ अंतर्गत पुढील कारवाईसाठी पोलिस स्टेशन, कन्हान, ता. पारशिवनी, जि. नागपुर येथे आणण्यात आला. पुढील तपासासाठी पोलिस स्टेशन, कन्हान येथे कंटेनर चालक श्री. विपीन राणा, कंटेनरचा क्लिनर श्री. अमित राणा, मे. चेतन वर्गो, गुरुग्राम, हरियाणा चे मालक मुकेश चहल, वर्मा रोडवेज, कानपुर चे मालक श्री. दिनेश वर्मा, मे. संजय मेल्स एजन्सी, दिल्ली चे मालक व मे. के. आर. के. इंटरनॅशनल, बेंगलोर चे मालक श्री. दिपक अग्रवाल यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३, २७४, २७५ व १२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. श्री. अभिमन्यु काळे, अन्न सुरक्षा आयुक्त व मा. डॉ. राहुल खाडे, सह आयुक्त (दक्षता), अन्न व औषध प्रशासन (म.रा.), मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. आनंद महाजन, सहायक आयुक्त (दक्षता), श्री. यदुराज दहातोंडे, अन्न सुरक्षा अधिकारी (दक्षता) श्री. ललित सोयाम व श्री. अमरनाथ सोनटक्के, अन्न सुरक्षा अधिकारी, नागपुर यांनी केली.
Narendar Puri