सुरेश भोयर, राजेंद्र मुळकांचे ‘वेट अँड वॉच’
कामठी :-येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रदेश कांग्रेसच्या निर्देशानुसार कांग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्यांचे अर्ज मागविले होते.यानुसार काहींनी भरलेले अर्ज जिल्हा कांग्रेस समितीकडे सादर केले तर काहींनी प्रदेश कांग्रेसकडे सादर केले आहेत .यामध्ये कामठी-मौदा विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी अर्ज सादर केले असले तरी आजच्या आव्हानात्मक स्थितीत असलेल्या पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात महत्वाचे प्रतिस्पर्धी मानले जाणारे माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक व सुरेश भोयर यांच्या इच्छुक अर्जाची वर्णी न लागल्याने ‘वेट अँड वॉच’च्या स्थितीत आहे तर यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्येही निवडून येण्याची क्षमता नसणाऱ्यांनीही अर्ज दाखल केले तेव्हा कांग्रेसचा दर्जा खालावतोय की विधांसभेसारख्या निवडणूकसंदर्भात स्थानिक कांग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते गंभीर नाहीत अशी शंका आल्याशिवाय राहत नाही.
कांग्रेस लोकशाही मानणारा पक्ष आहे , लोकसभेपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये इच्छुकांना उमेदवारीसाठी अर्ज दाखल करण्याची संधी दिली जाते .त्यातून लोकसभा व विधांनसभेसारख्या निवडणुकामध्ये सक्षम उमेदवारांची निवड प्रदेश पातळीवरून केली जाते .विधांनसभेसारख्या महत्वाच्या निवडणूकामध्ये पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची संधी पक्षातील इच्छुकांना दिले जाते ही प्रशंसनीय बाब आहे मात्र ज्यांच्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकितही विजय मिळविण्याची क्षमता नसणारे तसेच आजच्या स्थितीत आव्हानात्मक असणाऱ्या बावनकुळे सारख्या उमेदवाऱ्या विरोधात विधानसभेसाठी दावेदारी करतात तेव्हा आश्चर्य व्यक्त केले जाते.कांग्रेसचा दर्जा खालावतोय की दुसऱ्या तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना निवडणुकीची गंभीरताच नाही अशी शंका उपस्थित व्हायला लागते .
मग हेच तिकिट न मिळालेले इच्छुक उमेदवार निवडणुकीचे तिकीट मिळणा ऱ्यांना पाडण्यासाठी काम करीत असल्याचा कांग्रेस मधील आजवरचा अनुभव आहे ज्यामुळे कांग्रेसच्या पराभवाला कांग्रेसचीच गटबाजी जवाबदार हे कथन अजूनही कायम आहे.ज्यावेळी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा प्रचार जोमात आलेला असतो तेव्हा कांग्रेसमध्ये तिकीट कुणाला मिळणार यावर रस्सीखेच सुरू होते.तोपर्यंत जनतेशी नाळ जोडण्यात इच्छुकांपैकी कुणालाही उत्सुकता नसते .इतर पक्षामध्ये उमेदवारीसाठी अशी रस्सीखेच कुठेच दिसून येत नाही , त्यांचे विधानसभा निवडणुकीचे उमेदवार एक दोघांपैकी जवळजवळ निश्चित झाले असून त्यांची विधानसभेची तयारी सुद्धा सुरू झालेली आहे.
कामठी-मौदा विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून कांग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी व कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हुकूमचंद आमधरे, मो आबीदभाई ताजी, प्रसन्ना तिडके, जी प सदस्य नाना कंभाले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तापेश्वर वैद्य, महादेव जिभकाटे,विनोद मिसाळ, आशिष चव्हाण, फिरोज अहमद अन्सारी यांनी अर्ज सादर केलेले आहेत.
मागील 2014 च्या विधानसभा निवडणुकित माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनाच कांग्रेसची उमेदवारी तिकीट मिळणार या विश्वासपूर्ण आश्वासनातून भोयर यांनी जोमाने प्राचाराला गती देत नोयोजन बद्घ पद्धतीने जनतेशी नाळ जोडली होती व तसा नागरिकांचा सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळणे सुरू झाले होते दरम्यान स्थानिक नेता मिळणार असे अपेक्षित होते मात्र तिकीट वाटपात ऐनवेळी रात्रीच्या 12 वाजता पक्षश्रेष्टीच्या आदेशावरून सुरेश भोयर यांच्या ऐवजी बाहेरचे उमेदवार माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांना तिकीट ची घोषणा करन्यात आली परिणामी झालेल्या निवडणुकीत कांग्रेसला मोठ्या मताने पराभव स्वीकारावा लागला व या विधानसभेत ऐतिहासिक अशी हॅट्रिक करीत बावनकुळे विजयो झाले होते ते आजच्या स्थितीत सर्वाना आव्हानात्मक ठरले आहेत तर यांच्या विकासपुरुष म्हणून भूमिकेत असलेल्या कामातून व चाणक्यबुद्धितून यांनी बहुतांश विरोधक संपवित भावणूक नतमस्तक करून ठेवलेले आहेत .नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तोंडघशी पडलेल्या निकालाने या विधानसभेत इच्छुकांनी आतापासूनच धास्ती करून बसले की काय?अशी स्थिती झाली आहे.
संदीप कांबळे कामठी