Advertisement
बारामती : लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्यानिमित्ताने बारामती मतदारसंघाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. पवार विरुद्ध पवार अशा या लढतीत राष्ट्रवादी गटाच्या सुप्रिया सुळे यांचा विजय झाला आहे.
त्यांनी महायुतीच्या उमेदवार आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभूत केले. विजयानंतर सुप्रिया सुळे यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली.
‘श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी,लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद कहाणी!!’ असे कॅप्शन लिहित त्यांनी एक फोटोही पोस्ट केला आहे.
या फोटोमध्ये वडील शरद पवार,आई, प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे यांचं कुटुंब पाहायला मिळाले. तसेच रोहित पवार सुद्धा या फोटोमध्ये दिसत आहे.