Advertisement
भंडारा : उपवनसंरक्षक भंडारा या पदाचा पदभार आज एस.बी. भलावी यांनी स्विकारला. वनाचे संरक्षण व संवर्धनाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी पदभार स्विकारतांना सांगितले.
श्री. भलावी यांनी भंडारा आणि गोंदिया जिल्हयात 17 वर्षे सेवा दिली आहे. यापूर्वी ते नागपूर येथे कार्यरत होते. वनाचे संरक्षण व संवर्धन संबधांने नागरिकांच्या सुचनांचे स्वागत करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. वन पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ही भलावी म्हणाले.
वनासंबधी नागरिकांच्या विधायक सुचना असल्यास त्यांनी 9422830750 या भ्रमणध्वनीवर किंवा 07184-252283 या दुरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत सांगाव्यात असे आवाहन त्यांनी केले.