पांढरकवडा : पांढरकवडा वन परिक्षेत्र अंतर्गत चार वर्तुळ पंधरा बीट व एक तपासणी नाका येतो. क्षेत्रिय कर्मचारी क्षेत्रिय कामे करतात तर टी पी फॉरेस्टर व तपासणी नाक्या वरील वनपाल वनोपजास पास देण्याचे काम करतात. परंतु पिंपळखुटी येथील एका वनपालाने वनउपज तपासणी नाका खासगी व्यक्तीच्या ताब्यात दिला आहे. पांढरकवडा वन परिक्षेत्र अंतर्गत पिंपळखुटी येथे राज्य सिमेवर वन विभागाचा तपासणी नाका आहे.
त्याठिकाणी दोन वनपाल आहेत. येथे परराज्यातून येणाऱ्या वनोउपज ची तपासणी करून बदल पास दिली जाते. त्या आधारे तो माल महाराष्ट्रात व महाराष्ट्र तून बाहेर जाई पर्यंत ती पास चालते. पण पास लिहणे हे एका वनपालाचे महत्वाचे कर्तव्य असते. वाहतूक पास हा खुप महत्वाचा दस्तऐवज असतो. पिंपळखुटी येथिल वनपाल कधीही स्वतः पास लिहीत नाही.
फक्त सही करतात. पास लिहिण्यासाठी त्यांनी दहा हजार रुपये महिन्याचा माणूस ठेवला आहे. तोच नाक्यावरील सर्व नोंदी घेतो. दहा हजार रुपये महिना देने यांना कसे काय परवडते? नाक्या वर काम करण्यासाठी खासगी माणूस ठेवता येतो का? वन परिक्षेत्र अधिकारी यांना नाक्या वर शासकीय कामासाठी खासगी माणूस नेमता येतो का? की वन विभागाने पिंपळखुटी वनउपज तपासणी नाका भाडे तत्वावर दिला आहे.
तेथील एक वनपाल यांना विचारले असता हा आमचा विषय आहे आम्ही काहीही करू असे उत्तर मिळाले. मारेगाव चे आर एफ ओ माझे नातेवाईक आहेत सीसीएफ साहेबांच्या गाडीवरील वनपाल व यवतमाळ येथील नविन वेजीलेंस dfo आमच्या जातीचे आहे त्यामुळे मला कोणी काही म्हणू शकत नाही. अशा प्रकारे जातीच्या लॉबी मुळे या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढते.
आणि त्यामुळे संबंधित अधिकारी ही काही करु शकत नाही. एकीकडे फिल्ड मध्ये स्वतः काम करणाऱ्या कर्मचाऱ्यां कडून थोडीही चूक झाली तर त्यांच्या वर कडक कारवाही केली जाते परंतु इथे पुर्ण नाका खासगी व्यक्तीच्या ताब्यात दिलेला असुनही अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कसे काय?
योगेश पडोळे पांढरकवडा