Advertisement
चंद्रपूर : वणी-चंद्रपूर-आर्णी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांची जीभ घसरल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या सभेत मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर टीका करताना असभ्य भाषेचा वापर केल्याने काँग्रेस नेते संताप व्यक्त करत आहेत.
भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत पंतप्रधान मोदी उपस्थित होते.यावेळी काँग्रेसवर टीका करताना मुनगंटीवार यांनी आक्षेपहार्य विधान केले. मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर टीका करताना भाऊ-बहिणींना गळफास लावणारा आणि एकाच बेडवर झोपवणारा पक्ष असे वर्णन केले. मुनगंटीवार यांच्या तोंडून असा शब्दप्रयोग ऐकून सर्वांच्या भुवया उंचावल्या.उच्च विद्या विभूषित मुनगंटीवार यांच्याकडून अशा असंस्कृत भाषेचा वापर झाल्याने समाज माध्यमावर त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.