नागपूर : देशभरात शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे. यापार्श्वभूमीवर राजकरण विसरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज घटस्थापनेच्या निमित्ताने दोघेही एकाचवेळी कोराडीच्या देवीच्या मंदिरात एकत्रित आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचले.
राजकारणात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झाडणारे भाजप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
यावर आम्ही राजकीय पक्ष म्हणून इथे आलो नाही, तर आईची मुलं म्हणून एकत्र आलो असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
आम्ही राजकीय पक्ष म्हणून इथे आलो नाही, तर आईची मुलं म्हणून एकत्र आलो असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही आईकडे विजयाचा आशिर्वाद मागितला.बावनकुळे आणि मी आम्ही दोघे भाऊ आहोत, असेही पटोले म्हणाले.
तर कोराडीच्या आईचा जन्म नाना पटोले यांच्या गावचा असल्याची आख्यायिका आहे. देवीकडे महाराष्ट्रात सुख संपन्न नांदू दे अशी प्रार्थना केल्याचे ते म्हणाले. कुठलीही राजकीय कटुता आज नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.