कामठी :-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या हमालपुरा येथे पीडित फिर्यादीच्या मुलीला दगड मारून तिला लज्जास्पद होईल असे वर्तन करून अपमानित करणाऱ्या भाजप शहर च्या पूर्व पदाधिकारी विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी चे नाव मनोज घोटे रा हमालपुरा असे आहे.
जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर पीडित फिर्यादि ची मुलगी ही घरात झाडाझुड करीत असता सदर आरोपी ने तिला दगड मारला यासंदर्भात फिर्यादी ने दगड का मारला असे विचारले असता आरोपीने फिर्यादीच्या मुलीला ओढून तिला लज्जास्पद निर्माण होईल असे वर्तन करून अपमाणित केल्याची घटना सकाळी साडे दहा वाजता घडली .
यासंदर्भात फिर्यादी पीडित मुलीच्या आईने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मनोज घोटे विरुद्ध भादवी कलम 354, 323, 504, 506 अंनव्ये गुन्हा नोंदवोला असून पुढील तपास सुरू आहे.
संदीप कांबळे कामठी