मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी आज गांधीभवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.
गांधीभवन या प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात माजी न्यायमूर्ती ठिपसे यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा अर्ज भरून काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी ठिपसे यांना काँग्रेस सदस्यत्वाची पावती व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.
यावेळी खा. कुमार केतकर, माजी मंत्री वसंत पुरके, आ. अमर राजूरकर, आ. रामहरी रूपनवर, आ. अमित झनक, आ. डी. एस. अहिरे, माजी आ. मोहन जोशी, आनंदराव गेडाम, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, पृथ्वीराज साठे, रामकिशन ओझा, यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.