नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोप प्रत्यारोपात आता परमबीर सिंह यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली आहे.या प्रकरणाशी संबंधित त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले. यात त्यांनी अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांच्या संदर्भातही काही खुलासे केले.सलील यांनी याबाबत ‘नागपूर टुडे’शी संवाद साधत परमबीर सिंह यांना धारेवर धरले आहे.
परमबीर सिंह एक नंबरचा लुच्छा, लफंगा असून देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून ते आमच्यावर आरोप करत असल्याचा घणाघात सलील देशमुख यांनी केला. परमबीर सिंह पोलीस आयुक्त बनण्यासाठी १० जणांच्या घरी कुत्र्यासारखा फिरत होता. सिंह यांच्यात हिमंत आहे तर त्यांनी कॅमेऱ्यासमोर येऊन बोलावे, असे आव्हानही सलील देशमुख यांनी केले.
देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरूनच परमबीर सिंह यांचे आरोप-
परमबीर सिंह यांच्यासोबत माझी अनिल देशमुख गृहमंत्री होण्याच्या आणि परमबीर सिंह मुंबईचे आयुक्त होण्याच्या आधी काही वेळा भेट झाली होती. मात्र, त्या भेटीचा संदर्भ त्यांनी अशा पद्धतीने देणे चुकीचे आहे. अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपये वसुलीचे आरोप झाल्यानंतर कधीच परमबीर सिंह यांच्यासोबत माझी भेट झाली नसल्याचा सांगत परमबीर सिंह यांनी केलेले आरोप सलील देशमुख यांनी फेटाळून लावले आहे. देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरूनच परमबीर सिंह आमच्यावर आरोप करत असल्याचे ते म्हणाले.
परमबीर सिंह यांनी केलेला आरोप-
एप्रिल २०२१ मध्ये संजय पांडे यांनी मला कार्यालयात बोलावून धमकी दिली होती. त्याआधी फोनवरही धमकी दिली होती. जर मी देशमुखांवर केलेले आरोप मागे घेतले नाहीत तर तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवले जाईल. या सर्वांचे फोन रेकॉर्ड मी सीबीआयला दिलेत. सुप्रीम कोर्टातही ते सादर केलेत. मला धमकी दिली जात होती. गुन्हा मागे घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात होता असेही परमबीर सिंह यांनी म्हटले.
परमबीर सिंह यांना अँटिलिया स्फोटक प्रकरणात अटक होणार-
परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांना बोलायचे होते, तर त्यांनी आधी हे सर्व का सांगितले नाही? कोर्टापुढे जाऊन त्यांनी या आधी हे सर्व का सांगितले नाही.अँटिलिया स्फोटक प्रकरणाचा मास्टर माईंड परमबीर सिंहच आहेत. त्यांना याप्रकरणी अटक होणार असल्याचे सलील देशमुख म्हणाले.