Published On : Wed, May 24th, 2023
By Nagpur Today Nagpur News

माजी आमदार आशिष देशमुख यांची सहा वर्षासाठी काँग्रेसमधून हकालपट्टी

Advertisement

मुंबई : काँग्रेसचे बंडखोर नेते, माजी आमदार आशिष देशमुख यांची सहा वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. देशमुख यांच्यावर शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर आशिष देशमुख आपल्या राजकीय वाटचालीसंदर्भात काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देशमुख हे भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात आशिष देशमुख यांनी वारंवार विधाने केली होती . यानंतर त्यांना पक्षाकडून नोटीस बजावण्यात आली होती. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी एक पत्रक जारी केले असून त्यात आशिष देशमुख यांना निलंबित करण्यात आले आहे. देशमुख यांना सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.

Gold Rate
Wednesday 12 March 2025
Gold 24 KT 86,400 /-
Gold 22 KT 80,400 /-
Silver / Kg 98,300 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

काँग्रेसने प्रसिद्धी पत्रात म्हटले की, आपण आपल्या पक्षाविरोधी वर्तनाबद्दल आणि जाहीर वक्तव्याबद्दल दिलेले उत्तर समितीला समाधानकारक वाटत नाही. त्यामुळे काँग्रेसच्या घटनेतील शिस्तपालन नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे या प्रकरणात लागू होतात. आपण केलेल्या पक्षविरोधी वक्तव्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने तुम्हाला काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वातून सहा वर्षाच्या कालावधीसाठी निष्कासन करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळेच तुम्हाला सहा वर्षासाठी निष्काषित करण्यात येत असल्याचे पत्रात म्हटले आहे.

Advertisement