नागपूर : –महाराष्ट्र राज्य लघु उद्योग महामंडळ व रोजगार हमी योजनां मंडळाचे माजी अध्यक्ष राहिलेले कामठी विधांनसभा क्षेत्राचे माजी आमंदार यादोराव भोयर यांचे रविवारला वृध्दापकाळाने निधन झाले.
ते नागपूर जिल्हा परिषदेचे माजी जि.प. अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर यांचे वडील होते.भोयर यांची अंतिमयात्रा कामठी येथील छावणी परिषद परिसर निवासस्थानातून आज 12 नोव्हेंबर सोमवारला निघेल.
सायंकाळी साडे चारवाजेच्या दरम्यान कामठी येथील सदाशिवराव शिक्षण संस्था पाटील शिक्षण संस्था द्वारा संचालित महाविद्यालय परिसरात अंत्यदर्शनासाठी काहीवेळ पार्थिव ठेवण्यात येणार आहे.