नवी दिल्ली: माजी पंतप्रधान अटलबिहारी वायपेयींच्या पार्थिवावर आज सायंकाळी ५.०० वाजता मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आला. नमिता भट्टाचार्य या त्यांच्या मानस कन्येने त्यांना मुखाग्नी दिली. यावेळी त्यांच्यावर शासकीय इतमामात आदरांजली वाहण्यात आली. वाजपेयींचा मृत्यू गुरवारी एम्स रुग्णालयात झाला होता. त्यांच्या मृत्यूने देशभरात शोक पसरलेला आहे.
तत्पूर्वी, वाजपेयींचे पार्थिव काल कृष्ण मेनन मार्ग येथील त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. आज सायंकाळी ५ वाजता त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मान्यवर आणि नेत्यांची रीघ लागली आहे.
वाजपेयी यांना ११ जुनला एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या किडनीत संसर्ग झाला होता. तसेच मूत्र विसर्जनातही अडथळा येत होता. त्यांची एक किडनीही निकामी झालेली होती. गेले नऊ आठवडे त्यांच्यावर ‘एम्स’मध्ये उपचार सुरू होते. अखेर गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली.