नागपूर : शहरात दोन दिवसांपासून येत असेलल्या अवकाळी पाऊस आणि वादळामुळे अनेक झाडे आणि झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. वादळामुळे काहींना जीव गमवावा लागला तर अनेक जण जखमीही झाले.
इतकेच नाही तर अनेक भागातील वीजपुरवठाही खंडित करण्यात आला. वीज खंडित झाल्यामुळे नागपूरच्या कमाल चौकात बलराज इमारतीत एक 86 वर्षीय महिला लिफ्टमध्ये अडकल्याची धक्कादायक घटना घडली. त्यानंतर इमारतीतील लोकांचा एकच गोंधळ उडाला.
या घटनेची माहिती मिळताच वीज विभागाकडून काही काळ वीजपुरवठा सुरू करण्यात आला आणि वृद्ध महिलेला लिफ्टमधून सुखरूप बाहेर काढण्यात आले.कमलाबाई कोमलकर असे या महिलेचे नाव असून त्या कमल चौकातील बलराज इमारतीत राहतात.