Advertisement
नागपूर : अंबाझरी पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध तंबाखूजन्य पदार्थासह पॉट, तसेच हुक्का पिण्याकरता लागणारे साहित्य बागळणाऱ्या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट २ ने केली आहे. अर्सलान मिर्झा भइंबेग (रा. भुतिया दरवाजा, महाल),कौस्तुभ गांजेवार,रोहित श्रीवास्तव, प्रितेश आमले अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी आरोपींकडून प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ असलेले फ्लेवर, पॉट, तसेच हुक्का पिण्याकरता लागणारे साहित्य असा एकूण 54,400 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी आरोपीविरोधात कोटपा कायद्याच्या कलम 4(1) 5( 1)(21) अंतर्गत कारवाई केली.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे पुरावे गोळा केले. पुढील कारवाईसाठी आरोपीसह जप्त केलेले साहित्य अंबाझरी पोलिस ठाण्याकडे सोपवण्यात आले आहे.