Published On : Fri, Apr 13th, 2018

चौथ्या स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य कुस्तीगार परिषद तसेच मुंबई उपनगर जिल्हा पूर्व व पश्चिम तालीम संघ आणि विभागीय क्रीडा संकुल कार्यकारी समिती यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

या कार्यक्रमास स्व. खाशाबा जाधव यांचे चिरंजीव ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव विकास संस्थेचे सचिव रणजित जाधव, ऑलिम्पिक विजेते पैलवान नरसिंह यादव, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद तथा आयोजन समितीचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

Gold Rate
Monday 10 Feb. 2025
Gold 24 KT 85,600 /-
Gold 22 KT 79,600 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुंबई उपनगरात प्रथमच बोरिवली येथे चौथ्या स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे(पुरुष व महिला) आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा आज शुभारंभ झाला असून तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत जवळपास ३०० खेळाडू सहभागी होणार आहेत.

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा (पुरुष महिला) २०१७-१८ च्या स्पर्धांमध्ये फ्री स्टाईल गटात १०० पुरुष खेळाडू, ग्रीको रोमन गटात १०० पुरुष खेळाडू तर फ्री स्टाईल गटात १०० महिला खेळाडू सहभागी झाले आहेत.

फ्री-स्टाईल, ग्रीको रोमन आणि महिला फ्री-स्टाईल गटामध्ये १० वजन गटात या स्पर्धा होत असून ग्रीको रोमन व फ्री-स्टाईल गटामध्ये आणि महिलांच्या फ्री स्टाईल गटामध्ये १० लाख ४० हजार रुपये अशी एकूण ३१ लाख २० हजार रुपयांची भरघोस पारितोषिके या कुस्ती स्पर्धेत देण्यात येणार आहेत.

भारतासाठी पहिले व कुस्तीतील हे पहिले ऑलिंपिक ब्राँझ पदक विजेते स्व. खाशाबा जाधव यांनी कुस्ती क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा गौरव म्हणून राज्य स्तरावर त्यांच्या नावाने स्व. खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीची जोपासना व वाढ होण्यासाठी विविध खेळांच्या माध्यमातून युवा पिढीमध्ये खेळाची आवड निर्माण करणे व त्यांच्या मधील क्रीडा गुणांना वाव देणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात कुस्ती सारख्या देशी खेळाबाबत ग्रामीण व शहरी भागात विशेष आत्मियता आहे. कुस्ती हा खेळ महाराष्ट्रात सर्वत्र खेळला जातो. देशातील इतर राज्यात व देशाबाहेरही कुस्ती खेळाचा प्रचार व प्रसार करण्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. राज्याची कुस्ती खेळातील कामगिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरही उल्लेखनीय आहे.

Advertisement