वाडी नगरपरीषदेचा उपक्रम.
वाडी: वाडी नगर परिषदेच्या क्षेत्रातील राशन कार्ड नसलेल्या नागरिकांना सोमवार पासून नप.तर्फे निशुल्क धान्य कीट वितरणास सुरुवात झाल्याची माहिती वाडी नगराध्यक्ष प्रेम झाडे उपाध्यक्ष श्री राजेश थोराने यांनी दिली.
वाडी पत्रकार संघाच्या कार्यलयातून जनतेच्या हितार्थ माहिती देताना सांगितले की या करोना च्या गंभीर परिस्थितीत गरीब व मजूर वर्ग त्यातही ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही त्यांची प्रचंड अडचण झाली आहे.ही बाब लक्षात घेता नगराध्यक्ष प्रेम झाडे व अन्य यांनी जिल्हाधिकारी यांना भेटून या नागरिकांना ही राशन साहित्य व ते ही नप च्या माध्यमातून वितरित करावे या साठी निवेदन देऊन पाठपुरावा केला होता.व नागरिकांकडून अर्ज ही मागविण्यात आले होते.नप ला प्राप्त 3500 अर्जा पैकी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 1700 अर्ज पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आले.
त्यानुसार किराणा किट्स नप ला तहसील कार्यल्यातून प्राप्त होताच मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाल यांच्या मार्गदर्शनात उपमुख्याधिकारी आकाश सहारे यांनी नियोजन करून जि.प.प्राथ.शाळेतून सोमवार पासून या किट्स चे वितरण करण्यास सुरुवात केली.गर्दी होऊ नये म्हनून लाभार्थीना नगरपरिषद कडून त्यांच्या मोबाईलवर पूर्ण माहिती व सूचना मिळेल त्यांनीच केंद्रावर धान्य किट्स घेण्यासाठी यावे व सोशल डिस्टनसिंग,मास्क इ.नियमांचे पालन करावे.
ज्यांचे नाव यादीत आले नाही,त्यांनी आपले नाव व आधार कार्ड क्र. ची नोंदणी करावी त्यांना दुसऱ्या फेरीत निशुल्क किट्स मिळतील,तर उर्वरित A P L कार्ड धारकांना 1मे पासून शासनाच्या नियमाप्रमाणे राशन दुकानातून अल्प दरात धान्य मिळेल .अधिक माहितीसाठी न प मध्ये सम्पर्क करावा अशी माहिती त्यांनी दिली.