Published On : Fri, Sep 2nd, 2022
By Nagpur Today Nagpur News

ज्येष्ठ आणि दिव्यांगाना तीर्थ क्षेत्र दर्शनासाठी नि:शुल्क ई-बस सेवा

Advertisement

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा : पूर्व नागपुरातील ४५४९ लाभार्थ्यांना 35 हजार सहाय्यक साधने वितरीत

नागपूर : पूर्व नागपुरात महाराष्ट्रातील पहिल्या दिव्यांग पार्कला मंजुरी मिळाली असून, येत्या तीन महिन्यात पार्कच्या कामाला सुरुवात होणार आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना नागपूर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेता यावे यासाठी लवकरच निःशुल्क ई-बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन ई-बसेस नागपुरात आणणार असल्याची घोषणा केंद्रीय परिवहन व राज्य महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी केली. यामध्ये एक डबलडेकर ई-बसचा समावेश असणार आहे.

Today’s Rate
Wednesday 02 Oct. 2024
Gold 24 KT 76,200 /-
Gold 22 KT 70,900 /-
Silver / Kg 91,100/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारच्या दिव्यांग सहाय्यता योजना (अडीप – असिस्टंट टू डिसेबल पर्सन) आणि राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत दिव्यांग आणि ज्येष्ठांना सहाय्यक साधने वितरण करण्यात येत आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून नागपूर शहरात विधानसभा क्षेत्रनिहाय साहित्य वितरणाचे शिबिर घेण्यात येत असून, या अंतर्गत गुरूवारी १ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्व नागपूरमधील लाभार्थ्यांकरिता सरदार वल्लभभाई पटेल (कच्छीविसा) मैदान, ए.व्ही.श्री. ले-आउट लकडगंज येथे शिबीर घेण्यात आले. यावेळी श्री. नितीन गडकरी बोलत होते.

Advertisement

याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, विकास कुंभारे, मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, अतिरिक्त आयुक्त श्री. दीपककुमार मीना, श्री. राम जोशी, उपायुक्त श्री. विजय हुमणे, लकडगंज झोनचे सहायक आयुक्त श्री. गणेश राठोड, माजी नगरसेवक सर्वश्री नरेंद्र (बाल्या) बोरकर, ॲड. धर्मपाल मेश्राम, प्रदीप पोहाणे, मनोज चाफले, प्रमोद पेंडके, चेतना टांक, कांता रारोकर, मनीषा कोठे, मनीषा धावडे, मनीषा अतकरे, दीपक वाडीभस्मे, हेमंत पारधी यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. नितीन गडकरी पुढे म्हणाले की, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ क्षेत्राचे दर्शन घेता यावे याकरिता नागपूर-शेगाव अशी बस सेवा सुरू आहे. आता ज्येष्ठ नागरिकांना आणि दिव्यांगांना नागपूर ते आदासा, नागपूर ते माहूर, नागपूर ते धापेवाडा अशा तीर्थ क्षेत्रांचे दर्शन घेता यावे यासाठी डबलडेकर ई-बस सुरु करण्यात येणार आहे. तसेच लवकरच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र तयार करण्यात येणार असल्याचेही ना. गडकरी यांनी सांगितले. याशिवाय पूर्व नागपुरातील दर्शन कॉलनीमध्ये सुरू होणाऱ्या विरंगुळा केंद्रांचेही लवकरच उद्घाटन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. श्री. गडकरी यांनी उत्तमरीत्या शिबीर आयोजित केल्याबद्दल श्री. नरेन्द्र (बाल्या) बोरकर यांचे अभिनंदन केले.

समाजातील प्रत्येक घटकाचा विकास व्हावा, तसेच ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांना सर्व सोई सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नागपुरातील सर्व विधानसभा क्षेत्रात विविध मेळावे घेण्यात येणार आहे. त्याअंतर्गत पूर्व नागपुरातील ४५४९ (अडीप – ५९०, वयोश्री- ३९५९) लाभार्थ्यांना एकूण ३४१३० (अडीप- १२०२, वयोश्री- ३२९२८) साहित्य, उपकरणे वितरित करण्यात आले. या साहित्याची एकूण किंमत ४.८२ कोटी रुपये एवढी असल्याचेही ना. गडकरी यांनी सांगितले. शहरातील हजारो दिव्यांग आणि ज्येष्ठांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांनी नागपूर महानगरपालिकेचे कौतुक केले. ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात प्रतिनिधीक स्वरुपात दहा दिव्यांगाना व ज्येष्ठ नागरिकांना केन्द्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते उपकरणे प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमात केंद्र सरकारच्या दिव्यांग सहाय्यता योजना (अडीप – असिस्टंट टू डिसेबल पर्सन) आणि राष्ट्रीय वयोश्री योजना संदर्भातील माहिती चित्रफीत व दक्षिण नागपूरातील रेशिमबाग येथे झालेल्या लाभार्थी कार्यक्रमाची चित्रफीत दाखविण्यात आली. मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर म्हणाले की, सामाजिक सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत साहित्य वाटप करण्यात येत आहे. नागरिकांना याचा निश्चित लाभ होईल.

श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोरोना काळात समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत मदत पोहोचविल्याबद्दल श्री.नितीन गडकरी यांचे आभार मानले. कार्यक्रमात दिव्यांगांसाठी सुरु होणारा दिव्यांग पार्क कसा असेल याचे संकल्पचित्र दर्शविण्यात आले. श्री. कृष्णा खोपडे यांनी पूर्व नागपूरातील ज्येष्ठ नागरिकांना व दिव्यागांना नि:शुल्क साहित्य उपलब्ध केल्याबद्दल श्री. गडकरी यांचे आभार मानले.

कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले आणि एलिम्कोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. सेनगुप्ता यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, (एलिम्को), नागपूर महानगरपालिका, नागपूर जिल्हा प्रशासन आणि सीआरसी नागपूर यांनी सहकार्य केले.

राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत देण्यात येणारी उपकरणे

वॉकिंग स्टिक

श्रवण यंत्र

एल्बो कक्रचेस

व्हीलचेअर

ट्रायपॉड्स

क्वॅडपॉड

कृत्रिम मर्डेचर्स

स्पेक्टल्स

क्वॅकपॉड

स्पेक्टल्स

एडीआयपी योजनेंतर्गत देण्यात येणारी उपकरणे

वॉकिंग स्टिक

एल्बो कक्रचेस

एझलरी कक्रचेस (कुबडे)

कृत्रिम अवयव

श्रवण यंत्र

ट्रायपॉड्स

क्वैडपोड

व्हीलचेयर

ट्रायसिकल (मॅन्युअल)

ट्रायसिकल (बॅटरी)

कॅलीपस

TLM कीट

ब्रेल कीट (दृष्टीहिन करीता)

स्मार्ट फोन (दृष्टीहिन करीता)

डेजी प्लेयर (दृष्टीहिन करीता)

स्मार्ट केन (दृष्टीहिन करीता)