58 महसुल अधिकारी कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी
कामठी :- जसे 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष आहे तसेच 1 ऑगस्ट ते 31 जुलै हे महसूल वर्ष आहे आणि महसूल वर्षाचा पहिला दिवस म्हणजे 1 ऑगस्ट आहे.महसूल विभाग हा शासकीय यंत्रणेचा कणा असून 1 ऑगस्ट महसुल दिनानिमित्त कामठी नगर परिषद नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने तहसील कार्यालयात तहसिल कार्यालयातील समस्त महसूल अधिकारी कर्मचारी सह इतर विभागोय कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
यामध्य तपासणी केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची मधुमेह, रक्तदाब, थायराईड, किडनी, लीवर आदींची मोफत तपासणी करण्यात आली.या मोफत आरोग्य शिबिराचा जवळपास 58 अधिकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला.
या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला तहसिलदार माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली तसेच तहसीलदार अरविंद हिंगे यांच्या तपासणी पासून शिबिराची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी नायब तहसिदार गणेश जगदाडे, नायब तहसीलदार आर डी उके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ अश्विनी फुलकर, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ शबनम खाणुनी, स्वाती वाघमारे , अमोल पौड, शेख शरिफ, राजेश कठोके, युवराज चौधरी, रामभाऊ उरकुडे, दिनकर गोरले , मंडळ अधिकारी, तलाठी प्रामुख्याने उपस्थित होते.
हे मोफत आरोग्य निदान तपासणी शिबिर यशस्वीरीत्या पार पडले असून शिबिराच्या यशस्वीतेसाठी तालुका आरोग्य अधिकारि डॉ अश्विनी फुलकर, वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खाणुनी, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे राजू उरकूडे, अनिल नान्हे, रंजना कवरती, सुमित्रा वाघधरे, शुभांगी भोकरे, सुषमा दिव्यांगी, सीमा नगरारे, कोमल जवादे, स्वाती वाघमारे, स्वाती भवसागर, तिजारे आदींनी वैद्यकीय सेवा पुरविली.
संदीप कांबळे कामठी