नागपूर : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरातच भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे. दक्षिण नागपूरचे विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांना यावेळी पक्षाने तिकीट नाकारलंयय. त्यामुळे कोहळे नाराज आहेत. आज त्यांच्या घरासमोर समर्थक कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली. यावेळी कार्यकत्यांसमोर बोलताना कोहळे यांनी बंडखोरी करण्याचे स्पष्ट संकेत दिलेत. ते म्हणालेत. कार्यकर्ता हरला आणि मित्र जिंकला. कार्यकर्त्यांशी बोलून पुढचा निर्णय घेऊ असे संकेतही त्यांनी दिलेत. त्यामुळे कोहळे हे बंडाच्या पावित्र्यात आहेत असं बोललं जातंय.
भाजपने केलेल्या सर्व्हेत कोहळे यांच्याबद्दल अनुकूल मत नसल्याने त्यांना तिकीट नाकारण्यात आलं असं बोललं जातंय. पण त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे. फक्त नागपुरातच नाही तर राज्यात अनेक ठिकाणी तिकीट नाकारल्या गेल्याने भाजपचे नेते बंडाच्या तयारीत आहेत.