मुंबई : अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे.यावर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपले मत मांडले. अर्थसंकल्प एकूण मला आचार्य अत्रेंची आठवण आली. आचार्य अत्रे असते तर म्हणाले असते की, गेल्या 10 हजार वर्षात एवढा बोगस अर्थसंकल्प मी पाहिला नव्हता, असा खोचक टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.
या अर्थसंकल्पात मी सभागृहात बसून अर्थसंकल्प कसा मांडला जातोय, त्यातील काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा सार काढायचा झालं तर, उद्या सूर्य उगवणार आहे, सर्वांना प्रकाश मिळणार आहे आणि तुम्हाला विट्यामीन डी सुद्धा त्यातून मिळेल, अशा स्वरुपाचा हा अर्थसंकल्प असल्याचा घणाघात ठाकरे यांनी केला.
महायुतीकडून निवडणुकीच्या काळात वारेमाप जाहिराती करण्यात आल्या होत्या. ज्या गोष्टी जाहिरातीत सांगितल्या आणि सरकार निवडून आणले, मतं मिळवली. ठीक आहे, त्यातील ईव्हीएम घोटाळा हा भाग वेगळा आहे. पण प्रचंड बहुमतवाले हे सरकार आहे.
सरकारने दिलेल्या थापामधून एकतरी सरकारने पूर्ण केल्या आहेत का? लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले का? असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.