Published On : Mon, Mar 24th, 2025
By Nagpur Today Nagpur News

फरार प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक झाल्याची माहिती; कोल्हापूर पोलीस अधिकृत घोषणा करणार

Advertisement

नागपूर :छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करून इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप असलेला नागपूर येथील पत्रकार प्रशांत कोरटकर याला अखेर अटक करण्यात आली आहे.

माहितीनुसार, तेलंगणामधून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. कोल्हापूर पोलीस लवकरच याबाबत माहिती देण्याची शक्यता आहेत. प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व अर्जावरील सुनावणी उच्च न्यायालयाने सोमवारी ठेवली आहे.

Gold Rate
Wednesday March 2025
Gold 24 KT 87,800 /-
Gold 22 KT 81,700 /-
Silver / Kg 99,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तोपर्यंत न्यायालयाने अटकेपासून संरक्षणही दिले नव्हते. त्यामुळे प्रशांत कोरटकर हा परदेशी पळून गेल्याचा संशय व्यक्त केला जात होता. त्याचा दुबईतील फोटो व्हायरल झाल्यानंतर कोलकाता विमानतळावरुन तो दुबईला पळून गेल्याचा संशय होता.

कोल्हापूर कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कोरटकरने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पोलिस त्याचा शोध घेत होते अखेर तो तेलंगणात सापडला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. प्रशांत कोरटकर गेल्या महिनाभरापासून फरार होता. अखेर तेलंगणातून त्याला अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोल्हापूर पोलिस हे थोड्याच वेळात यासंदर्भातील महत्वाची आणि अधिकृत माहिती देण्याची शक्यता आहे.

Advertisement
Advertisement