नागपूर: नागपूर महानगररपालिद्वारे फुटाळा तलाव येथे शनिवारी (ता.9) श्रमदान करण्यात आले. यावेळी आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी फुटाळा तलाव स्वच्छेता मोहिमेचा आढावाही घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर प्रामुख्याने उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील सर्व तलाव संपूर्णपणे स्वच्छ करण्याची मोहिम हाती घेतली आहे. शनिवारी फुटाळा तलाव येथे नागपूर महानगरपालिकेच्या सर्व झोनच्या अधिकारी व कर्मचारी यांनी श्रमदान केले. तलावातील जलपर्णी काढण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तलावातील गाळ मोठ्या प्रमाणावर काढण्यात आलेला आहे. या गाळ योग्य त्या जागी साठविण्यात यावा, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. तलावाच्यालगत असलेल्या जागेत फक्त दिवसातून तीन तास पार्किंग करण्यात येईल, अशी सोय करण्यात यावी, दिवसभरासाठी वाहनांना पार्किंगसाठी बंदी घालण्यात यावी, असे निर्देश आय़ुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले.
तलावाच्यालगत असलेले अतिक्रमण आयुक्तांनी त्वारित हटविण्याचे आदेश देताच, परिसरातील अतिक्रमणावर बुलडोजर चालविण्यात आले. तलावापरिसरातील दुकांनानी आपली हद्द सोडून अवैधरित्या शेड टाकले आहे. त्यावर आयुक्तांनी सर्व दुकानांना नोटिस देऊन ते शेड काढून टाकण्यात यावे, असे निर्देश दिले. मजुर नकाशानुसार जर बांधकाम नसेल तर ते ही काढून टाकण्याचे आदेश यावेळी आय़ुक्तांनी संबंधित अधिका-यांना दिले.
फुटाळा तलावाच्या परिसरात प्रत्येक 100 मीटर अंतरावर कचरा पेटी ठेवण्यात यावी, जेणे करून नागरिक कचरा त्या कचरा पेटीतच टाकतील. तलावात घाण केल्या जाणार नाही, अशा सूचना देखील आयुक्त वीरेंद्र सिह यांनी केल्या. परिसरात प्राळीव प्राणी आणण्यासाठी मज्जाव करण्यात यावा, परिसरात येणा-या गायी- म्हशीचा बंदोबस्त करण्यात यावा, असे निर्देश आयुक्तांनी दिले. परिसरात सूचना फलक ही लावण्यात यावे, असे निर्देश आय़ुक्तांनी दिले.
परिसरात मंदिराचा काही भाग वाढविण्यात आलेला आहे. या बाबत नासुप्र ला पत्र पाठविण्यात यावे, मंदिराचे बांधकाम मंजुर नकाशाप्रमाणे आहे की नाही, याची खातरजमा करावी, त्याचा अहवाल मला सादर करावा, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले.
यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, कार्यकारी अभियंता अनिरूद्ध चौंगजकर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, पशुचिकिस्तक डॉ.गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त विजय हुमने, अशोक पाटील, राजेश कराडे, हरिश राऊत, प्रकाश वराडे, स्वास्थ निरिक्षक रोहिदास राठोड यांच्यासह सर्व झोनल अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.