Published On : Sat, May 16th, 2020

नागपुरातील गड्डीगोदामचा काही परिसर सील

Advertisement

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश : कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने निर्णय


नागपूर : नागपूर महानगरपालिका हद्दीतील मंगळवारी झोन क्र. १० अंतर्गत येणा-या गड्डीगोदाम प्रभाग क्रमांक ०९ या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरु नये व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता काही परिसर सील करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.

या आदेशानुसार प्रभाग क्रमांक ०९ च्या दक्षिण पूर्वेस युवराज साखरे यांचे घर, दक्षिण- पश्चिमेस जयस्वाल रेशन शॉप, दक्षिण -पश्चिमेस किशोर शाहू यांचे घर, पश्चिमेस अन्नपूर्णा मंदीर, पश्चिमेस गड्डीगोदाम चौक, उत्तरेस गुरुव्दारा जवळील रेल्वे अंडर ‍ब्रिज, पूर्वेस फेमस लायब्ररी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या भागात येणारे व जाणारे सर्व मार्ग तात्काळ बंद करून या भागाची सीमा आवागमनासाठी पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सदर भागातील नागरिकांना प्रतिबंधित क्षेत्राचे बाहेर जाण्यास व सदर प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील नागरिकांना सदर क्षेत्रात येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 77,900 /-
Gold 22 KT 72,500 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खाजगी डॉक्टर, परिचारीका, मेडीकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलिस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.

Advertisement