नागपूर – नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या अतिशय महत्वपूर्ण असलेल्या कामठी मार्गावरील उड्डानपूलचे निर्माण कार्य आणि विद्यमान रेल्वे लाईनच्या वर मेट्रो मार्गिकेच्या निर्माण कार्याला महा मेट्रोच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे. या ठिकाणी देशात पहिल्यांदाच वेगळ्या पद्धतीची संरचना असलेल्या चार स्तरीय बांधकाम केल्या जात आहे.
मध्य रेल्वेने नुकतेच गड्डीगोदाम येथील रेल्वेच्या जमिनीवर निर्माण कार्याकरीता परवानगी दिली आहे. त्यामुळे याठिकाणी पायलिंग वर्कच्या कार्याला सुरुवात करण्यात आली असून प्रस्तावित डबल डेक्कर स्ट्रक्चर कामठी मार्ग,गड्डीगोदाम येथील गुरुद्वारा जवळील रेल्वे लाईनला क्रॉस करणार आहे. सदर निर्माण कार्य अतिशय कठीण आणि मुख्य म्हणजे सतत व्यस्त अश्या रेल्वे लाईन गड्डीगोदाम येथील आरयुबी(RuB) येथे करण्यात येत आहे.
गड्डीगोदाम क्रॉसिंग येथील संरचनेत ४ स्तरीय परिवहन व्यवस्था आहे. पहिल्या स्तरावर जमिनी मार्ग (विद्यमान आरयुबी मार्ग) रहदारी करीता असलेला रस्ता, दुसऱ्या स्तरावर रेल्वे ट्रॅक,निर्माण कार्य पूर्ण झाल्यावर तिसऱ्या आणि चौथ्या स्तरावर उड्डानपूल आणि मेट्रो मार्गिका राहील. सध्याची वाहतूक कोंडी लक्षात घेता ४ स्तरीय बांधकाम कार्य काळाची गरज आहे. सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कॉलेज, व्यापारी संकुल,बँक,शासकीय कार्यालय रस्त्याच्या दोन्ही बाजूने आहेत. तसेच हा रस्ता उत्तर आणि दक्षिण नागपूरला जोडणार प्रमुख रस्ता आहे. तसेच या मार्गावर रिजर्व बँक ऑफ इंडीया,कस्तुरचंद पार्क,सिताबर्डी किल्ला अश्या प्रमुख आणि ऐतिहासिक संस्था आहेत.
नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या रिच – २ अंतर्गत ४ स्तरीय संरचना असलेली परिवहन व्यवस्था आहे. या मार्गावरील मेट्रो मार्गिका सिताबर्डी इंटरचेंज ते आटोमोटीव्ह चौक मेट्रो स्टेशन पर्यत ७.३० कि.मी. लांबीची आहे. यामध्ये झिरो माईल,कस्तुरचंद पार्क,गड्डीगोदाम चौक,कडबी चौक, इंदोरा चौक,नारी रोड आणि आटोमोटीव्ह चौक मेट्रो स्टेशनचा समावेश आहे.
रिच -२ मार्गिकेवरील ५.३ कि.मी.(आटोमोटीव्ह चौक ते गड्डीगोदाम) इतका भाग डबल डेव्कर उड्डानपूलाचा आहे. तिसऱ्या स्तरावरील उड्डानपूल चार पदरी वाहतुकी करीता असेल ज्याची लांबी ७.५० मीटर प्रत्येकी एवढी राहणार. तांत्रिकी दृष्ट्या बघता १४०० मेट्रिक टन वजनाचे स्टील कंपोझीट ट्रस गर्डर रेल्वे ट्रॅकच्यावर योग्य लौचिंग पद्धतीने ठेवल्या जाईल. स्टील कंपोझीट ट्रस गर्डरचे वजन १४०० मेट्रिक असून ८०मी. स्पॅन
एवढा आहे. आरओबीची संरचनामध्ये पाईल फाउंडेशन,पियर्स आणि पोर्टल बीम व सुपर स्ट्रक्चर स्टील कंपोझीट ८० मी. स्पॅन ट्रस गर्डर चा समावेश आहे. आरओबी(RoB) ची उंची रस्त्यावरून २५ मी. एवढी आहे.
प्रकल्पांची प्रमुख वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे:
·प्रस्तावित उड्डानपूल आणि मेट्रो ट्रॅकज्याला ‘राईट ऑफ वे’ म्हणतात. म्हणजे या २ संरचनेचे निर्माण कार्य एका सिंगल पिलर वर होणार आहे. ज्यामुळे किंमत आणि रस्त्यावरील जागेचा कमी उपयोग होईल.
· उड्डानपूल संरचना एलआयसी चौक येथून सुरु होणार असून आटोमोटीव्ह चौक पर्यत कामठी रोड अश्या व्यस्त मार्गावर आहे.
· ४ स्तरीय वाहतूक प्रणाली पुढील प्रमाणे : १.) कामठी रोड, २.) नागपूर-भोपाळ रेल्वे लाईन, ३.) उड्डानपूल, ४.) मेट्रो व्हायाडव्ट
· मेट्रो व्हायाडव्टची सर्वात जास्त उंची गड्डी गोदाम येथील गुरुद्वारा जवळ असले ज्याठिकाणी रेल्वेमार्ग रस्त्यावरून जात आहे.
·उड्डनपुलाची सर्वात जास्त उंची रस्त्यावरून १४.९ मी. एवढी असेल.
· तसेच मेट्रो व्हायाडव्टची सर्वात जास्त उंची रस्त्यावरून २४.८ मी. एवढी असेल